शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये Techno Spark 2025 उत्साहात संपन्न
By nisha patil - 2/16/2025 12:10:04 AM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये Techno Spark 2025 उत्साहात संपन्न
कोल्हापूर, – विवेकानंद कॉलेजच्या बी.सी.एस. विभागात विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी Techno Spark 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी उद्घाटन केले, तर अध्यक्षस्थानी प्रा. एस. पी. थोरात होते.
कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, कोडींग, टेक्नो रांगोळी, पोस्टर प्रदर्शन अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पल्लवी देसाई यांनी केले होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विवेकानंद कॉलेजमध्ये Techno Spark 2025 उत्साहात संपन्न
|