मनोरंजन

तेजस्विनी पंडित आता दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणार

Tejaswini Pandit will now rule the southern cinema


By nisha patil - 12/8/2024 10:29:00 PM
Share This News:



अभिनेत्री तेजस्विनी पंडित  हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी तेजस्विनी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाली आहे. तेजस्विनी आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात वीरांगणा 'भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर 5 भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर 30 ऑगस्ट रोजी  प्रदर्शित होणार आहे.
 

अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का' हा चित्रपट आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता देव गिल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनपट आहे.


तेजस्विनी पंडित आता दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणार