बातम्या

जेवण स्वादिष्ट बनवणारा ‘तेजपत्ता’ या ७ समस्यांवर आहे गुणकारी

Tejpatta which makes food delicious is effective on these 7 issues


By nisha patil - 7/3/2024 7:37:38 AM
Share This News:



 तेजपत्ता हा गरम मसाल्यातील एक पदार्थ आहे. यामुळे पदार्थाला वेगळा सुगंध येतो. तसेच चव येते. याचे उत्पादन सिक्किम, हिमालय, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेशात होते. याची पाने तोडून ती उन्हामध्ये सुकवण्यात येतात. सुकलेल्या पानांनाच तेजपत्ता म्हणतात. तेजपत्ता आरोग्यासाठीसुद्धा लाभदायक आहे. यात अनेक औषधी गुणधर्म असतात.

हे आहेत फायदे
१ किडनी
किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे. तेजपत्ता पाण्यात टाकून पाणी उकळा आणि पाणी प्या. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी तेजपत्ता उपयोगी आहे.

२ डोकेदुखी
तेजपत्त्याच्या पानांच्या तेलाने मसाज केल्यास डोकेदुखी दूर होते.


३ कॅन्सर
यातील घटक कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

४ हृदयरोग
हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हृदय निरोगी राहते.

५ पचनक्रिया
अनेक प्रकारचे पचनासंबधीत आजार दूर होतात. बध्दकोष्ठावर रामबाण उपाय आहे.

६ मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी
शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. मधुमेहाने ग्रस्त असलेले लोकांनी याचे सेवन करावे.

७ निद्रानाश
तेजपत्त्याच्या पानांच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्याने शांत झोप लागते.


जेवण स्वादिष्ट बनवणारा ‘तेजपत्ता’ या ७ समस्यांवर आहे गुणकारी