विशेष बातम्या

स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसा वीजबीलात दहा टक्के सुट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ten percent discount on daytime electricity bills for those installing smart meters


By nisha patil - 7/3/2025 10:57:32 PM
Share This News:



राज्यभरात स्मार्ट व प्रीपेड मीटरला घरगुती वीजग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. मात्र आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसा वीज बिलामध्ये दहा टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर मधला फरक स्पष्ट करत त्यांनी ही घोषणा केली आहे.

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या वतीने 50 हजार रुपयांची वाढ करण्यात असल्याचंद त्यांनी सांगितलंय. 2017 पर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात येणार यामुळे 45 लाख कृषी पंपधारकांना फायदा होणार आहे. उजनीचे पाणी कोकणाकडे वळवण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अभिभाषानंतर ते बोलत होते.


स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसा वीजबीलात दहा टक्के सुट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Total Views: 29