बातम्या

लक्षतीर्थ वसाहत मधील मदरसावर कारवाईमुळे तणाव

Tension due to action on Madrasa in Lakshatirth Colony


By nisha patil - 1/31/2024 12:05:29 PM
Share This News:



 कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथल्या आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकानं मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आज सकाळी कारवाईचा बडगा उगारला . मात्र या परिसरातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला . इथले नागरिक आणि शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसच पोलिसांबरोबर नागरिकांनी हुज्जत घातली . त्यामुळ मोठा तणाव निर्माण झाला आहे . यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानं मोठा गोंधळ उडाला . मात्र पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं . अजूनही या परिसरात तणावाचं वातावरण आहे.


लक्षतीर्थ वसाहत मधील मदरसावर कारवाईमुळे तणाव