बातम्या

कोल्हापूराच्या महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात

Terrible accident at Kolhapur s Mahaveer College Chowk


By nisha patil - 10/19/2023 3:47:26 PM
Share This News:



कोल्हापूराच्या महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात 

मद्यधुंद चालकाने नऊ वाहनांना चिरडले

यात तरुण बॅडमिंटनपटूचा करूण अंत तर दोन गंभीर, सात जखमी

या भीषण अपघाताने  संपूर्ण कोल्हापूर शहर हादरले 

कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात काल भीषण अपघात झाला. या भीषण अपघात मद्यधुंद चालकाने बुधवारी रात्री साडेदहा वाजता बेदरकारपणे  कार चालवीत गजबजलेल्या महावीर कॉलेज चौकात दोन मोटारींसह पाच दुचाकी अशा सातवाहनांना चिरडले जीएसटी विभागाची एसयूव्ही कार  चालवणाऱ्या चालकाचे नाव ऋषिकेश कोतेकर असे आहे.

या भीषण अपघातात रवी कोरडे या तरुण बॅडमिंटन पट्टूचा जागीच करूण अंत झाला या अपघातात नऊजण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून रात्री साडे दहाच्या सुमारास मद्यपी चालकाने भरगाव वाहन दामट्याने महावीर कॉलेजच्या प्रवेशद्वारात सातवाहनांना धडक दिल्याने रस्त्यावर रक्त आणि काळजाचा सडा पडला होता या विचित्र अपघाताने संपूर्ण कोल्हापूर शहर हादरले आहे. 
    या अपघात प्रकरणी मध्ये धुंद अवस्थेत चार चाकी चालवत असलेला चालक ऋषिकेश बाबुराव कोतेकर याला जमावाने बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


कोल्हापूराच्या महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात