बातम्या
चौगुले महाविद्यालयात मराठी विषयाची ग्रंथ दिंडी
By nisha patil - 2/28/2024 4:09:28 PM
Share This News:
चौगुले महाविद्यालयात मराठी विषयाची ग्रंथ दिंडी
कोतोली श्रीपतराव चौगुले सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे भूषण ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विभागीय ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार होत्या.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी मनिषा सावंत,ग्रथंपाल मनिषा पाटील होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा.ए.आर. महाजन यांनी केले तर आभार प्रा. एम.वाय.पोवार यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
- श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये ग्रंथ प्रदर्शन प्रसंगी डॉ. विजयकुमार पाटील,डॉ.उषा पवार,
प्रा.ए.आर.महाजन,प्रा.एम.वाय. पोवार,प्रा.मनिषा सावंत,ग्रथंपाल मनिषा पाटील व मान्यवर
चौगुले महाविद्यालयात मराठी विषयाची ग्रंथ दिंडी
|