विशेष बातम्या
राज्याचे पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण जाहीर
By nisha patil - 2/6/2023 3:59:58 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम राज्य सरकारकडून पुढील पाच वर्षांसाठी नवीन वस्त्रोद्योग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तसेच 5 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यात टेक्स्टाईल पार्कचा विकास करण्यात येणार आहे. उत्पादित कापसावरील प्रक्रिया क्षमता 30 टक्क्यांहून 80 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. जुन्या धोरणाची मुदत 31 मार्च रोजी संपली होती. त्यामुळे नव्या धोरणाविषयी उत्सुकता होती. नव्या धोरणामध्ये पर्यावरणपूरक शाश्वत उत्पादनासाठी हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भर देण्यात आला आहे.
हरित तंत्रज्ञानाचा अवलंब, वस्त्रोद्योग घटकांना 50 टक्के भांडवल अनुदानासह प्रकल्पांना प्रोत्साहन, इंडियन ट्रीटमेंट प्लांटसाठी 5 कोटी, झिरो लिक्विड डिस्चार्जसाठी 10 कोटी, सोलर प्लांट्स काॅमन स्टीम जनरेशन पाण्यासाठी 1 कोटी, रिसायकल प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये देण्याची तरतूद, चार मेगावॉट क्षमतेपर्यंतच्या सोलर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी भांडवली अनुदान आदी मुद्यांचाही समावेश आहे.
राज्यातील वस्त्रोद्योग वाढीसाठी तसेच पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. सध्या विभागासाठी तीन महामंडळ कार्यरत आहेत. या तिन्ही मंडळाची या महामंडळात विलीनीकरण करण्यात येणार आहे.
राज्याचे पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण जाहीर
|