बातम्या

ठाकरे गटाने साजरा केला 50 खोके जागतिक वर्धापन दिन

Thackeray group celebrates 50 boxes world anniversary


By nisha patil - 6/20/2023 5:20:58 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  गतवर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेत उभी फूट पाडली. 40 आमदारांसह त्यांनी भाजप पक्षाची युती करून सत्ता स्थापन केली .आज या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं.  आजचा दिवस हा जागतिक 50 खोके वर्धापन दिन म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने साजरा करण्यात आला. शहरातील बिंदू चौकात जिल्हाप्रमुख विजय देवणे ,संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
20 जून 2022 ला महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक झाली. त्याच रात्री शिवसेने च्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरत आणि तिथून गुवाहाटीला रवाना झाले होते. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच सरकार स्थापन झालं. 40 गद्दार आमदारांनी 50 खोके घेऊन गद्दारी केली. आणि शिवसेनेच्या पाटीत खंजीर खुपसला .त्यामुळे आम्ही या 40 आमदारांचा आणि आमदार, खासदारांचा निषेध करत असल्याचं यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी यावेळी सांगितलं.
या निषेध आंदोलनात हर्षल सुर्वे,राजू जाधव, युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने, महिला उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे,दिपाली शिंदे, अवधूत साळुंखे ,विराज पाटील विशाल देवकुळे, किरण पडवळ ,दिनेश परमार ,सुशील भांदिगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


ठाकरे गटाने साजरा केला 50 खोके जागतिक वर्धापन दिन