बातम्या
'त्या बातम्या खोट्या..... ' ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू ...
By nisha patil - 2/8/2024 3:10:02 PM
Share This News:
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी वेशांतर करून विमानप्रवास केल्याचा मुद्दा राजकीय वादाचा विषय ठरला,याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्याचा हा विषय शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित करत सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विमान कंपनीला धारेवर धरलं. ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केलाच कसा? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून मुंबई आणि दिल्लीत त्यांना विमान प्रवास करू देणाऱ्या विमान कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच एवढी मोठी चूक झालीच कशी? याचे उत्तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले पाहिजे,’’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली, या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठका झाल्या. त्या बैठकांना जाण्यासाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने जात होतो. विमान प्रवासासाठी स्वतःचे नाव देखील बदलले होते, असे त्यांनीच खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले, अशा बातम्या आल्या. यावेळी पत्रकारांसमोर दिल्लीपर्यंतच्या विमान प्रवासाचा संपूर्ण घटनाक्रम कथन केल्याचे म्हटले गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना घेरले होते. त्यामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत आले होते. त्यावर त्यांनी मौन सोडत खुलासा केला आहे. आपण वेषांतर करुन दिल्लीला गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत. ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
'त्या बातम्या खोट्या..... ' ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू ...
|