मनोरंजन
सोशल मीडियावरिल कृष्णराज व आर्चीच्या त्या फोटोची चांगलीच चर्चा
By nisha patil - 11/2/2025 3:16:01 PM
Share This News:
सोशल मीडियावरिल कृष्णराज व आर्चीच्या त्या फोटोची चांगलीच चर्चा
सध्या या खासदार पुत्राची वेगळ्याच कारणासाठी चर्चा..
चक्क इन्स्टा वर दोघांच्या फोटोने एकच खळबळ..
कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूच्या फोटोची जोरदार चर्चा!
कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असणारे खासदार पुत्र कृष्णराज महाडिक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा फोटो अंबाबाई दर्शनावेळी काढल्याचं सांगितलं जात असून, कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू एकत्र दिसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वारसा लाभलेले कृष्णराज आणि मराठी चित्रपटसृष्टीत खास ओळख असलेल्या रिंकू राजगुरू यांच्या या भेटीमागचं नेमकं कारण काय? हा योगायोग आहे की खास भेट? याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
सध्या हा फोटो इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत असून, चाहते आणि राजकीय वर्तुळातील मंडळी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हा निव्वळ सामान्य योगायोग असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी यामागे वेगळं काही सूत्र असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
यासंबंधी अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही. मात्र, कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे, हे मात्र नक्की!
सोशल मीडियावरिल कृष्णराज व आर्चीच्या त्या फोटोची चांगलीच चर्चा
|