बातम्या
10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
By nisha patil - 8/30/2023 8:40:01 PM
Share This News:
यशवंत बिल्डिंग बी व सी को .ऑप हौसिंग सोसायटी कोल्हापूर या संस्थेची 10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
यशवंत बिल्डिंग बी व सी को .ऑप हौसिंग सोसायटी कोल्हापूर या संस्थेची 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .27-08-2023 रोजी सोसायटी पार्किंग मध्ये संपन्न झाली . सभेची सुरवात नव्याने नियुक्त केलेल्या चेअरमन shri अतुल शिरोडकर यांचे स्वागत करून झाली सोसायटीचे सेक्रेटरी यांनी ताळेबंद वाचन केले .
सभेस सर्व सभासद उपस्थित होते ,सोसायटीचे हित व प्रगती बाबत चर्चा ,सभासदांचे मत घेवून सभेत सभासदांनी सुचवलेले मुद्दे मंजूर केले सभासदांचे हिताचे निर्णय खालील प्रमाणे सर्वानुमते मंजूर करण्यात आले
सन 2022-2023 आर्थिक पत्रके मंजुरी .
सन 2023-2024 चे अंदाजपत्रक बजेट मंजूरी .
सोसायटीचे टेरेसवर सोलर पॅनल बसवून सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट द्वारे सोसायटीत कॉमन मीटरवरील लिफ्ट ,मोटर पंप ,पार्किंग व पॅसेजमधील वीज उपलब्ध करणेकरीता निविदा मंजुरी .
वार्षिक मेंटेनेन्स मध्ये मेंटेनन्स मागील प्रमाणे कायम असून मेंटेनन्स आकारणी बिल मंजूरी .
मेंटेनन्स थकबाकीदार सभासदावर कायदेशीर कारवाई करणे .
सोसायटीत कबुतर पक्ष्यांचा उपद्रव वाढत असलेमुळे आरोग्यास हानिकारक ठरत असलेमुळे कबुतर नेटचे काम करणेसाठी मंजूरी .
सोसायटीच्या नवीन बोअरवेल कामास मंजुरी .
सभेची सांगता सभेचे अध्यक्ष अजित चौगुले यांनी सर्व कमिटीचे , सभासदांचे आभार मानून केली
यावेळी चेअरमन अतुल शिरोडकर ,सेक्रेटरी अमित पाटील ,ट्रेझरर अमित जाधव ,सभेचे अध्यक्ष अजित चौगुले उपस्थित होते सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
|