बातम्या

हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवेल असं सौंदर्य, 52 वर्षांच्या राणीच

The 52 year old queen is a beauty that puts Hollywood and Bollywood actresses to shame


By nisha patil - 6/14/2023 4:43:24 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम जगातील टॉप परीकथेतील राणी  आणि तिच्या सौंदर्याबाबत तुम्ही आजपर्यंत अनेक कथा ऐकल्या असतील. सध्या अशाच एका खऱ्या राणीची जोरदार चर्चा रंगली आहे. क्वीन रानियासमोर जगभरातील सुंदर अभिनेत्री फिक्या दिसतात. वयाच्या 52 व्या वर्षी या राणीचं सौंदर्य तरुणाईलाही लाजवेल असं आहे. सोशल मीडियावर या राणीची सध्या खूप चर्चा रंगली असून फोटोही व्हायरल होत आहेत. या राणीबद्दल.सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या राणीचा उल्लेख 'ब्युटी विथ ब्रेन' असा केला जातो. वयाच्या पन्नाशीतही या राणीकडे लावण्याची खाण म्हणून पाहिलं जातं. जॉर्डनची राणी क्वीन रानिया यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. जॉर्डनची राणी क्वीन रानिया अल अब्दुल्ला या सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या सौंदर्याची चर्चा सर्वदूर रंगली आहे. अलिकडेच त्यांनी त्याच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. चाहते त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करताना थकत नाहीत.
क्वीन रानिया यांचा जन्म 31 ऑगस्ट 1970 रोजी कुवैतमध्ये झाला. त्या सध्या 52 वर्षांच्या आहेत. क्वीन रानिया या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. लग्नाआधी त्या एका बँकेत नोकरी करायच्या. त्यांनी अमेरिकन मल्टिनॅशनल टेक कंपनी ॲपलमध्येही काम केलं आहे.


हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवेल असं सौंदर्य, 52 वर्षांच्या राणीच