बातम्या

श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ८९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

The 89th anniversary of Shri Bahubali Brahmacharyasram and University was celebrated with enthusiasm


By nisha patil - 6/20/2023 5:38:27 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ८९ वा वर्धापन दिना उत्साहात संपन्न झाला.सकाळी भगवान बाहुबली बृहन्मुर्ती चरणाभिषेक झाले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर पाटील व प्रमुख अतिथी विजयकुमार शहा व नयना शहा यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीच्या 'भद्रदास' या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. 
भारतकुमार व नयना शहा म्हणाले,' देव शास्त्र गुरु यांना विसरू नका, आई-वडिलांची सेवा करा, गुरूकुल मधील विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार घ्यावेत व आपले भाव चांगले ठेवावेत'.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जणतारा शैक्षणिक संकुलचे चेअरमन महावीर पाटील हे होते. यावेळी  महामंत्री डी सी पाटील, संचालक गोमटेश बेडगे, तात्यासो अथणे, रवींद्र खोत, अशोक पाटील, सचिव ऋषभनाथ मलिकवाडे, अधीक्षक ए ए खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ८९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न