बातम्या

मुख्यमंत्र्यांनी घेतला स्वछता मोहिमेचा आढावा

The Chief Minister reviewed the Swachha campaign


By neeta - 1/24/2024 2:01:16 PM
Share This News:



मुंबई :   मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज मुंबईत सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. मुंबई महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे असून त्यासाठी सुरु केलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबईला देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. 
     संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे. ही मोहिम मुंबईच्या प्रत्येक गल्ली, रस्त्यापर्यंत पोहचायला हवी. प्रत्येक रस्ता, गल्लीसह सार्वजनिक शौचालये नियमितपणे स्वच्छ होणे आवश्यक असून या मोहिमेचा परिणाम मुंबईच्या अंतर्गत भागात दिसायला हवा. यासाठी लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची गरज भागविण्यासाठी आवश्यकता भासल्यास सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण, हिरवाई तयार करणे, सुशोभिकरणाकडे लक्ष द्यावे. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करुन त्यांच्यावर सुशोभिकरणाची जबाबदारी सोपवावी. महापालिकेची रुग्णालये, समुद्रकिनारे, मंडई, शाळांचे परिसर यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
      सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार राम कदम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी, अश्विनी भिडे, पी.वेलारसू, सुधाकर शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


मुख्यमंत्र्यांनी घेतला स्वछता मोहिमेचा आढावा