बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना खोचक टोला म्हणाले ...

The Chief Minister said to the opposition


By nisha patil - 1/3/2024 11:00:27 PM
Share This News:



मुंबई : विरोधकांना शेतकऱ्यांचं काही देणेघेणं नाही, काय दिले त्याचा हिशोब द्यायचा होता, आकडे आमच्याकडे आहेत. त्यामुळे शेतकरी कोमात आहे, अशा भाषा योग्य नाही, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून चौफेर टीका होत असल्याने  सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, तुम्ही 50 हजार दिले नाही, आम्ही खात्यावर जमा केले, तुम्ही केवळ पोकळ घोषणा केल्या. आमचं काम भरीव आहे
 

त्यांनी सांगितले की, सरकार गेलं हे मान्य करायलाच तयार नाहीत. त्यामुळे वस्तुस्थिती मान्य करा. सरकार वेगाने काम करत आहे, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे. नागपूर अधिवेशन असताना मी व देवेंद्र फडणवीस स्वतः माती व चिखल तुडवत गेलो. शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? असे प्रश्न कुणी मांडले होते. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार का? शेतकऱ्यांना योजना लागू केल्या आहेत. 29 हजार 520 कोटी रुपये शेतकऱ्यांचा खात्यात जमा केले आहेत. 12 हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी वर्षाला मिळत आहेत. 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो, खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो. इथं व केंद्रात आमचे सरकार आहे.डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना जबल आनंद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी योजनांना चालना दिली आहे. असे ते म्हणाले


मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना खोचक टोला म्हणाले ...