बातम्या

'द क्लीनिंग लेडी' फेम अभिनेत्याचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन

The Cleaning Lady fame actor passed away at the age of 42


By nisha patil - 10/1/2024 10:49:06 PM
Share This News:



हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता एडन कॅन्टो याचं निधनं झालं आहे. एडन कॅन्टोच्या निधनानं हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एडननं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अपेंडिसियल कॅन्सरमुळे एडन कॅन्टोचा मृत्यू झाला. एडन कॅन्टोच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचे चाहते  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
एडननं 'द क्लीनिंग लेडी'  या ड्रामा सीरिजमध्ये काम केले.

एडनने या अमेरिकन सीरिजमध्ये मुख्य भूमिका केली होती. तो या सीरिजमध्ये अरमान मोरालेसच्या भूमिकेत दिसला होता. एडन या सीरिजच्या दोन सीझनमध्ये देखील दिसला होता. पण तब्येतीच्या समस्येमुळे तो या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा भाग होऊ शकला नाही. 'द क्लीनिंग लेडी'  या ड्रामा सीरिजमुळे एडनला लोकप्रियता मिळाली.
एडन कॅन्टो हा गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाचा सामना करत होता. पण 8 जानेवारी रोजी त्यानं जगाचा निरोप घेतला.एडान कॅन्टो यांच्या पश्चात पत्नी स्टेफनी अॅन कॅन्टो आणि रोमन एल्डर आणि इव्ह जोसेफिन ही दोन मुले आहेत.


'द क्लीनिंग लेडी' फेम अभिनेत्याचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन