बातम्या

बिजिंगमध्ये २५ मार्चला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होणार..

The Fourth World Conference on Gender Equality and Women


By nisha patil - 7/2/2025 1:00:46 PM
Share This News:



बिजिंगमध्ये २५ मार्चला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होणार..

बिजिंग येथे २५ मार्चला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होत असून त्याअनुषंगाने मुंबई येथे कृती सत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ना. प्रकाश आबिटकरांनी उपस्थित राहून त्यानी संवाद साधला.

ना.प्रकाश आबिटकर म्हणाले की,मी ग्रामीण भागातून आलो आहे, एक सामाजिक संस्था चालवतो त्यामुळे तळागाळातील जनता आरोग्य सेवेसाठी कोणत्या परिस्थितीला सामोरी जातेय याची माहिती आहे. गर्भपात रोखण्यासाठी माहिती देणाऱ्याला एक लाख देण्याची सरकारी बक्षीस होते. मी पदभार घेतला व पत्रकार परिषदेत माहिती दिली तेव्हा पत्रकारांनी बातमी मोठी केली. 

कागदोपत्री कामे नको आहेत. आरोग्य विभागाने राज्य व जिल्हा पातळीवर आरोग्य समित्या नेमल्या आहेत त्या समितीच्या माध्यमातून राज्यातील महिला आरोग्य सेवेचे काम करून सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. यावेळी विधान परिषदेच्या सभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


बिजिंगमध्ये २५ मार्चला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होणार..
Total Views: 51