बातम्या
आंबा येथे संयुक्त वरची आळी मंडळाचा गरबा दांडिया कार्यक्रम उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/18/2024 4:52:26 PM
Share This News:
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गावोगावी भक्ती भावाचे व उत्साहाचे वातावरण असते. गावोगावी मंदिरांमध्ये पूजाअर्चा केली जाते व काही ठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात. आंबा येथील संयुक्त वरची आळी या मंडळाने रास गरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मुलां मध्ये व तरुण तरुणी मध्ये अशा कार्यक्रमाची उत्सुकता पाहायला मिळाली. रोज रात्री नऊ दिवस दांडिया खेळले जात होते व यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले. यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, बकेट बॉल , फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . व शेवटच्या दिवशी विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आली.
दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी फॅन्सी ड्रेस विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,यामध्ये विविध कार्टून पासून ते सेलिब्रिटी यांच्या वेशभूषा केलेले स्पर्धक पाहायला मिळाले.. डोरेमॉन , मिकी माऊस, स्पायडरमॅन,छोटा भीम सुप्रसिद्ध नर्तिकी गौतमी पाटील, या वेशभूषा केलेल्या स्पर्धकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बापू बिरू वाटेगावकर यांची वेशभूषा केलेले लोकनेते बासूजी गद्रे व त्यांच्या साथीदाराची भूमिका केलेले युवराज कांबळे यांनी उत्तम सादरीकरण केले. पुरुष वेशभूषा स्पर्धेमध्ये बासुजी गद्रे यांचा प्रथम क्रमांक आला.
उत्कृष्ट गरबा दांडिया नृत्य स्पर्धक सौ.अमृता संदीप बसरे यांची निवड करण्यात आली. व त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला व गौतमी पाटील यांची वेशभूषा सौ.प्रतीक्षा अस्वले यांनी केली होती. गौतमी पाटीलचा पोशाख करून साक्षात गौतमी पाटील गावात आल्याचा फील त्यानी करून दिला. त्यांचा महिला वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. त्याबरोबरच डोरेमॉन , छोटा भीम , व स्पायडरमॅन यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अशाप्रकारे नवरात्रीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आले. विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आली. सर्व कार्यक्रमाचे नेटकेपणाने आणि शांततेणे संयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आणि परीक्षण सौ श्रुती पाटील मॅडम व संदीप सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील संयुक्त वरची आळी मंडळाचे विविध पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
आंबा येथे संयुक्त वरची आळी मंडळाचा गरबा दांडिया कार्यक्रम उत्साहात संपन्न
|