बातम्या
शक्तीपीठ महामार्गाला महायुतीने एकजुटीने पाठबळ द्यावे – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 2/27/2025 9:32:39 PM
Share This News:
शक्तीपीठ महामार्गाला महायुतीने एकजुटीने पाठबळ द्यावे – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर – शक्तीपीठ महामार्ग हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असून, महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्याला एकजुटीने पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
या महामार्गामुळे १२ जिल्हे जोडले जाणार असून, प्रवासाचा वेळ १८ तासांवरून ८ तासांवर येणार आहे. यामुळे औद्योगिक, पर्यटन आणि रोजगार क्षेत्राला चालना मिळेल. विरोधकांनी पसरवलेले गैरसमज दूर होत असून, शेतकरी बांधवही या प्रकल्पाच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. महायुतीच्या काही नेत्यांकडून होणाऱ्या अंतर्गत मदतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि या प्रकल्पासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.
शक्तीपीठ महामार्गाला महायुतीने एकजुटीने पाठबळ द्यावे – आमदार राजेश क्षीरसागर
|