शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात ग्रंथ महोत्सवाचे दालन आजपासून खुले...
By nisha patil - 1/16/2025 3:15:34 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात ग्रंथ महोत्सवाचे दालन आजपासून खुले...
शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई....
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारीला पार पडणार आहे. तर दीक्षान्त समारंभानिमित्त दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचे दालन गुरुवार पासुन खुले होणार आहे. विद्यापीठाच्या प्रांगणात ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारीला पार पडणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलीय. दीक्षान्त समारंभानिमित्त दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचे दालन गुरुवारी खुले होणार आहे. यंदा ग्रंथ महोत्सवाचे १८ वे वर्ष असुन गुरुवारी सकाळी साडेसात वाजता राजारामपुरी येथील कमला कॉलेज येथून ग्रंथ दिंडीला प्रारंभ होणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन होणार आहे. राजमाता जिजाऊ सभा मंडपाजवळ अॅनेक्स इमारत प्रांगणात उभारलेल्या मंडपात पुस्तकांचे ४० स्टॉल आहेत. यामध्ये विविध विषयांवरील पुस्तके खरेदी करता येणार आहेत. १६ व १७ जानेवारी या दोन दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हा ग्रंथ महोत्सव सुरू राहणार आहे.
शिवाजी विद्यापीठात ग्रंथ महोत्सवाचे दालन आजपासून खुले...
|