बातम्या

अखेर 'द केरला स्टोरी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

The Kerala Story to release on OTT platforms


By nisha patil - 7/2/2024 11:46:13 PM
Share This News:



सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी'  हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. काही काळापूर्वी कोणताही OTT प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचे वृत्त होते. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असून आता हा चित्रपट याच महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
 

सुमारे 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 241 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि जगभरात 302 कोटी रुपयांची कमाई केली होती. एका वृत्तानुसार, या चित्रपटाचे निर्माते तो OTT वर प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत आहेत आणि म्हणूनच कोणताही OTT प्लॅटफॉर्म तो प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचे वृत्त होते. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडून 70-100 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यामुळे करार होऊ शकला नाही असे वृत्त होते. 
'
बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये समाविष्ट असलेल्या 'द केरळ स्टोरी'च्या ओटीटी रिलीजबाबत बराच गदारोळ झाला होता. गेल्या वर्षी 5 मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आतापर्यंत OTT वर प्रदर्शित होऊ शकला नाही. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट या महिन्यात 16 फेब्रुवारी 2024 रोजी OTT वर प्रदर्शित होत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ZEE5 वर येत आहे

'द केरळ स्टोरी'ची कथा खऱ्या घटनांनी प्रेरित असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. हा चित्रपट चार मुलींची कथा आहे ज्यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. केरळमधून 32 मुलींचे धर्मांतरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना आयसिसमध्ये सामिल करून घेतले असल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. मात्र, केरळमधून या दाव्याला विरोध करण्यात आला. अखेर कोर्टात हा वाद पोहचल्यानंतर 32,000 मुलींची संख्या ही अवघ्या तीनवर आली. सरकारच्या आकडेवारीनुसार, फक्त तीन मुलींनी आयसिसमध्ये प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले.  'द केरळ स्टोरी' हा राजकीय हेतूने प्रेरीत असून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. 


अखेर 'द केरला स्टोरी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज