बातम्या
अनुदान टप्पा वाढीचा विषय निर्णायक वळणार शिक्षकासोबत खासदार बसले जमिनीवर
By nisha patil - 8/17/2024 6:49:29 PM
Share This News:
अनुदान टप्पा वाढीचा विषय निर्णायक वळणार
शिक्षकासोबत खासदार बसले जमिनीवर
खासदार धैर्यशील माने यांनी शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर साहेब यांना केला फोन
पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होणार मा शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांचे स्पष्टीकरण
20 ऑगस्ट ला कोल्हापूर मध्ये मुख्यमंत्री यांच्या सोबत शिष्टमंडळाची भेट घडवून आणणार :- खासदार धैर्यशील माने
पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेतला जाईल: राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर
आज आंदोलनाचा 16 वा दिवस असल्याने आज शिंदे गटाचे खासदार श्री धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील दारात 300 ते 400 शिक्षकांनी सकाळी 9.30 ठिय्या केला मा खासदार धैर्यशील माने हे थोडया वेळाने बाहेर आले,व सर्व शिक्षक खाली बसलेले पाहून ते स्वतः जमिनीवर बसले शिक्षकांना धक्का दिला, माझा शिक्षक रस्त्यावर असेल तर मी खुर्चित कसा बसू असे म्हणत ते खाली बसले,शिष्टमंडळाचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले,नेमके काम कोणत्या ठिकाणी काम थांबले आहे हे त्यांना सांगितले, त्यानंतर त्यांनी सरळ शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर साहेब लावला स्पीकर फोन केला व बोलायला सुरुवात केली
अनुदान टप्पा वाढीचा विषय निर्णायक वळणार शिक्षकासोबत खासदार बसले जमिनीवर
|