बातम्या

मराठा आंदोलनाला कोल्हापुरातही हिंसक वळण

The Maratha movement turned violent in Kolhapur as well


By nisha patil - 10/31/2023 9:04:17 PM
Share This News:



 मराठा आरक्षण साठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात ,तालुक्यातसकल मराठा समाजाचे वतीने आंदोलन सुरु आहेत कोल्हापूरमध्येही साखळी पद्धतीने आंदोलन सुरु आहे, परंतु आता कोल्हापुरातील शिरोळमध्ये या आंदोलनाला हिसंक वळण लागले आहे मराठा आरक्षणाचे मागणीसाठी आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी कुरुंदवाड आगाराची बस शिरोळमध्ये फोडली आहे या बसवर दगडफेक करण्यात अली आहे 

राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न चिगळलेला असून आता जाळपोळ ,नेत्याच्या घरावर हल्ला होत आहे अशातच कोल्हापुरातील शिरोळमध्ये या आंदोलनाची ठिणगी पडली असून मंगळवारी सकाळी कुरुंदवाड पुणे स्टेशन हि बस शिरोळमध्ये दत्त साकार कारखाना येते अली असता अज्ञाताने बसच्या मागील बाजूच्या काचा फोडल्या त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आरक्षणप्रश्नी हिसंक वळण लागले आहे .या घटनेने शिरोळ तालुक्यात तणावाचे वातावरण झाले आहे


मराठा आंदोलनाला कोल्हापुरातही हिंसक वळण