बातम्या
उत्पन्न वाढीसाठी गार्डन मधील मत्सालयही पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांना साकडे
By nisha patil - 5/18/2024 4:14:39 PM
Share This News:
कोल्हापूर, तां. 17 - कोल्हापूर मधील महावीर गार्डनचा आत्ता कायापालट होत आहे आणि ही बाब शहर सौंदर्यात नक्कीच भर घालत असून ती कौतुकास्पद ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या गार्डन मधील बाजूला करून ठेवलेले लाखो रुपये किमतीचे खेळाचे किंवा खेळण्याचे साहित्य अक्षरशः धूळ खात पडून आहे. या खेळाच्या साहित्याचा पुनर्वापर करावा किंवा हे साहित्य स्क्रपसाठी
काढावे तसेच गार्डन मधील बरीच वर्ष बंद पडलेले मत्सालय उत्पन्न प्राप्तीसाठी पुन्हा सुरू करावे, अशी मागणी कोल्हापूरमधील समाजमन बहुदेशिय सामाजिक संस्था एका निवेदनाद्वारे करत आहे.
कोल्हापूर मधील महावीर गार्डन हे एक महत्वाचे आणि मध्यवर्ती आकर्षणाचे तसेच नागरिकांच्या श्रम परिहाराचे आवडीचे ठिकाण आहे. आता तर या गार्डनचा कायापालट होत आहे. हे गार्डन पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक आणि सुविधांनी परिपूर्ण होत आहे. मात्र, त्याचवेळी येथील लहान मुलांच्या खेळाचे, खेळण्याचे जुने साहित्य बाजूला करून ठेवले असून ते गेल्या काही वर्षापासून तेथेच अक्षरश धूळ खात पडून आहे. उन्ह, पावसाच्या माऱ्यामुळे हे लाखो रुपयांचे साहित्य गंजून जाऊन निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यात घसरगुंडी, पाळणा आदी साहित्याचा समावेश आहे. हे साहित्य गंजून निकामी होण्यापूर्वी महापालिका उद्यान विभागाने त्वरित स्क्रॅप मध्ये घालावे किंवा ते सुस्थितीत असेल तर त्याचा बागेतील इतर कामासाठी पुनर्वापर करावा. त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी गार्डन मधील महापालिका यांना ज्यातून चांगले उत्पन्न मिळत होते असे
मत्सालय पुन्हा सुरू करावे. कारण अलीकडच्या काळात कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटक यांची संख्या वाढली आहे. हे मत्सालय सुरू केल्यास त्यातून पुन्हा महापालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी समाजमन बहुदेशिय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे, खजानिस सतीश
वडणगेकर यांनी निवेदनातून करत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी महापालिका आयुक्तांना समाजमन संस्थेने मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी समाजमन संस्था अध्यक्ष महेश गावडे समाजमन संस्थेचे हितचिंतक राजेंद्र मकोटे, नीता गायकवाड, मालोजी केरकर, रोहित कांबळे उपस्थित होते.
उत्पन्न वाढीसाठी गार्डन मधील मत्सालयही पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांना साकडे
|