बातम्या

नरके गटाचा मंगळवारी विठाई चंद्राई हाँलमध्ये मेळावा

The Narke group met in Chandrai Hall on Tuesday  get together


By nisha patil - 4/28/2024 11:36:57 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : कोल्हापूर  लोकसभा मतदारसंघातील एक प्रबळ उमेदवार अभ्यासू नेते अर्थतज्ञ डॉ चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा केली होती.कार्यकर्ते नी नाराजी व्यक्त केली होती. काळजावर दगड ठेवून निर्णय घेण्यात आला होता. डॉ. चेतन नरके गटाचा मेळावा घेऊन पाठिंबा देण्यासाठी सदरचा मेळावा आयोजित करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

  
चेतन नरके हे उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांनी के आय टी कॉलेज मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन कॉम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर्स केले आहे. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रॉंचेस्टर या उत्तम फायनान्स युनिव्हर्सिटी मध्ये एमबीए फायनान्स केले. अमेरिकेमध्ये त्यांनी बऱ्याच उत्तम  कंपनीमध्ये आयटी क्षेत्रातील आणि फायनान्स क्षेत्रातील मोठ्या पदाच्या नोकऱ्यांचा अनुभव घेतला. त्यानंतर सिंगापूर मध्ये ते स्ट्रॅटेजिक डिरेक्टर या उच्च पदावर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अभ्यासण्यासाठी व त्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची नेमणूक झाली. या सर्व प्रवासात ते कोल्हापूरला विसरले नाहीत, उच्चपदस्थ जबाबदाऱ्या पार पाडताना कोल्हापूरच्या संस्कारांची आणि नेतृत्वगुणांची नेहमीच त्यांना मदत झाली असे ते सांगतात.

सध्या  नरके थायलंड गव्हर्मेंट मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे  युथ डेव्हलपमेंट बँकेचे चेअरमनपदासह , गोकुळ दूध संघाचे संचालक अशा अनेक प्रशासकीय नेतृत्व पदांवरती चेतन नरके यांना अनुभव प्राप्त झाला आहे. आयुष्यात कोणती गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाही त्यासाठी त्यांना संघर्ष करावाच लागला आणि संघर्ष करण्याची बाळकडू त्यांना कोल्हापूरच्या संस्कारातून मिळाले आहे. तरुणांना एकत्र करुन रोजगार, उद्योग, उपलब्ध करून देण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करणार आहेत.
 

कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्ते यांच्या शी चर्चा करण्यासाठी त्यांनी मंगळवार दि.३० एप्रिल ला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


नरके गटाचा मंगळवारी विठाई चंद्राई हाँलमध्ये मेळावा