विशेष बातम्या

'द नाईट मॅनेजर 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

The Night Manager 2 will soon hit the screens


By nisha patil - 5/6/2023 6:33:08 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम 'द नाईट मॅनेजर' या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.'द नाईट मॅनेजर'च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'द नाईट मॅनेजर 2' ही सीरिज प्रेक्षक येत्या 30 जूनपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपालासह तिलोत्तमा शोम, रवी बहल, शाश्वत चॅटर्जी हे कलाकारदेखील या सीरिजमध्ये दिसणार आहेत. 
थरार नाट्य असणाऱ्या 'द नाईट मॅनेजर 2'ची चाहत्यांना उत्सुकता
रावणाची लंका जाळण्यासाठी आग तर लावावीच लागेल, असे डायलॉग 'द नाईट मॅनेजर 2'च्या ट्रेलरमध्ये आहेत. त्यामुळे आता या सीरिजमध्ये शॉन शैलीची लंका जाळताना दिसणार आहे. थरार नाट्य असणाऱ्या 'द नाईट मॅनेजर 2' या सीरिजमध्ये अनेक रहस्यमय गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. 
 प्रियांका घोष आणि संदीप मोदीने सांभाळली आहे. जॉन ले कॅरी  यांनी लिहिलेल्या ब्रिटिश मालिका 'द नाईट मॅनेजर'वर बेतलेली ही मालिका आहे. या बहुचर्चित सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


'द नाईट मॅनेजर 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला