बातम्या

सुळकूड प्रश्र्नी लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा

The Sulkood issue should be resolved at the earliest


By nisha patil - 8/2/2024 12:31:53 PM
Share This News:



सुळकूड प्रश्र्नी लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा

कृती समितीचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेना निवेदन

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे काम होणार नाही : कृती समिती

इचलकरंजी सुळकुड पाणी बचाव योजना कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुळकूड प्रश्नी मार्ग काढण्यात यावा यासाठीचे निवेदन देण्यात आले.इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या दूधगंगा पाणी योजनेच्या अंमलबजावणी बाबत पुन्हा एकदा कृती समितीने शासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात म्हटले आहे की खासदार धैर्यशील माने यांनी सुळकुड पाणी योजना अंमलबजावणी संदर्भात 11 सप्टेंबर 2023 रोजी बैठक आयोजित केली होती. परंतु मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या प्रश्नामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर आज अखेर चार पाच महिने उलटून गेल्यानंतरही या बैठकीबाबत कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही. वस्त्रोद्योग मंत्री यांनीही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र तेही शक्य झाले नाही. त्यामुळे इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या पाणी योजना अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन मार्ग निघावा यासाठी कृती समितीच्या वतीने नामदार अंबादास दानवे यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरची योजना ही  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मंजूर झालेली असून गैरसमज व विरोध यामुळे हा प्रश्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे काम निश्चितच होणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढावा व शक्य तितक्या लवकर सहकार्य करावे असे निवेदन कृती समितीच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी कृती समितीचे सयाजीराव चव्हाण, महादेव गौड, मदनराव कारंडे(राष्ट्रवादी काँग्रेस प्रांत सदस्य), नितीन जांभळे(शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), संजय कांबळे(काँग्रेस शहराध्यक्ष), कॉ. सदा मलाबादे, लक्ष्मण पाटील(शिवसेना उपशहर प्रमुख) व मारुती बने(शिवसेना विभाग प्रमुख) आदी उपस्थित होते.


सुळकूड प्रश्र्नी लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा