बातम्या

बाकी संपदा मंचचा तेरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

The Thirteenth Anniversary of Bhaki Sampada Manch concluded with excitement


By nisha patil - 12/1/2024 7:57:47 PM
Share This News:



सखी संपदा मंचचा तेरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न जिजाऊ मा साहेबांच्या जयंतीचे अवचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम घेण्यात आले
 

ती जशी उंचावता, नभ जरासे वाकले ,पसरली जोशना तिची, चंद्र तारे झाकले ,अशी ही सखी संपदा नेहमीच महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी काम करते. वर्षभर या मंचतर्फे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आज वर्धापन दिनानिमित्त प्रदर्शन सोहळा आणि स्नेहसंमेलन भरवण्यात आलं होतं
 

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली सखी संपदा मंचच्या अध्यक्षा  स्वप्नजा घाडगे आरती पाटील संगीता खाडे शुभांगी थोरात विद्या साळुंखे कविता साळुंखे यांच्या हस्ते  करण्यात आले  या प्रदर्शनामध्ये छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आला आहे या प्रदर्शनाला विविध शहरातून महिलांनी जवळजवळ वीस पेक्षा जास्त स्टॉल लावले होते यामध्ये महिलांनी घरी बनवलेल्या गृह उपयोगी ,संसारिक आणि गृह सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते  तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . त्याचबरोबर प्रदर्शनास भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी शुभांगी सिल्क साडी यांच्याकडून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे या प्रदर्शनासाठी विविध शहरातून महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे


बाकी संपदा मंचचा तेरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न