बातम्या

विशाळगडावरील दंगल ही, सत्तेच्या राजकारणासाठी पूर्वनियोजित कट - उबाठा

The Vishalgad riot is a preplanned plot for power politics


By nisha patil - 7/18/2024 6:36:57 PM
Share This News:



तीन दिवसांपूर्वी विशाळगडावर दंगल होऊन मोठयाप्रमाणात नुकसान झाले.संभाजीराजे यांनी पुकारलेल्या अतिक्रमण मुक्ती आंदोलनाप्रसंगी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. दंगल पूर्वनियोजित होती यात कोणतीही शंका नाही. जिल्हाप्रशासन व जिल्हापोलीस प्रशासन यांचे फार मोठे अपयश असून निष्काळजीपणा आहे. संबंधीत विभागाचे डी. वाय. एस. पी व पोलीस निरीक्षक यांना निलंबीत करावं. जिल्हाधिकारी  व जिल्हापोलीस प्रमुख यांची या गंभीर प्रकरणात निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी व्हावी.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांना देण्यात आलय 

 

यावेळी उपनेते संजय पवार, विजय देवणे, संजय चौगुले, सुजित मिणचेकर,रविकिरण इंगवले, प्रतिगण्या उतुरे, स्मिता सावंत,आदी उपस्थित होते.


विशाळगडावरील दंगल ही, सत्तेच्या राजकारणासाठी पूर्वनियोजित कट - उबाठा