बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेचा विषय

The WhatsApp status of a person who died in a fire in Chhatrapati Sambhajinagar is currently the topic of discussion


By nisha patil - 4/4/2024 4:34:37 PM
Share This News:



छावणी परिसरातील कपड्यातील इमारतील आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. याच मृत महिलेचा पती वसीम शेख यांनी दुर्घटनेच्या चार तास अगोदर व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते. या स्टेटसची आता चर्चा होत आहे. योगायोगाने या स्टेटसमध्ये मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. स्टेटसच्या माध्यमतून वसीम यांनी अल्लाहकडे भीतीदायक मृत्यू देऊ नको, अशी विनंती केली होती. या स्टेटसनंतर अवध्या चार तासांनी आगीची घटना घडली आणि यातच वसीम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसीम यांना कदाचित मृत्यूची चाहूल लागली असावी असे म्हणत या परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत दोन भावांचे अख्खं कुटुंबच संपलं आहे. यामध्ये 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचाही समावेश असल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे. या भयावह घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.वसीम शेख यांनी आपल्या स्टेटसच्या माध्यमातून अल्लाहकडे विनंती केली आहे. हे स्टेटस व्हिडीओ रुपात असून तो हिंदी भाषेतील आहे.'हम बरी अजियत में है, दिन-ब-दिन जिंदगी हाथों से निकाली जा रही है! और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आए! हम ऐसी मौत नहीं मरना चाहते, हमें मरते ही जहन्नुम का कुर्ता पहना दिया जाए! या अल्लाह हम ऐसी मौत मरना नहीं चाहते, की कब्र में जाते ही सांप हमारे ऊपर चढ़ जाए! हम ऐसी मौत नहीं मरना चाहते, की कब्र अंधेर तरीकी में बन जाए! या अल्ला हम ऐसी मौत नही मरना चाहते, की तुम हमे हसर के दिन कहे दफा होजा!'असं या स्टेटसमध्ये म्हणण्यात आलंय.


छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेचा विषय