बातम्या

गांधीनगर खुन प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासातच अटक

The accused in the Gandhinagar murder case were arrested in just a few hours


By nisha patil - 11/1/2025 10:41:50 PM
Share This News:



 गांधीनगर खुन प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासातच अटक 

मूळचा परभणी येथील व सध्या गांधींनगर येथे राहणाऱ्या विठ्ठल उर्फ बबलू सुभाष शिंदे याचा काल धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या खुनाचा अवघ्या तीन तासातच पोलिसांना छडा लावण्यात यश आलंय. याप्रकरणी २ अल्पवयीन बालकांसह ५ आरोपीना गांधीनगर पोलिसांनी अटक केलीय.

शुक्रवारी रात्री गांधीनगर येथील गांधी पुतळ्या जवळील बागेमध्ये विठ्ठल शिंदे या मुळच्या परभणीमधील व सध्या गांधीनगर मध्ये राहत असलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला होता.त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.या खुनाच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास  सुरु असताना अवघ्या तीन तासातच गांधी नगरातीलच पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.शलमन कांबळे ,प्रथमेश कानडे ,शुभम आवळे,समीर नदाफ ,सोमनाथ भोसले ,रोहन सोनावणे ,गौरव माने या टोळक्याने हा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय.गेल्या दोन दिवसांपूर्वी आरोपींपैकी एका विधी संघर्ष  बालकाचा विठ्ठल उर्फ बबलू शिंदे यांच्याशी वाद झाला होता.याचाच राग मनात धरून त्याचा काटा काढन्याच्या हेतुने टोळक्याने मयत विठ्ठल शिंदे याला काल रात्री ११. ३० वाजता मोटारसायकल वरून जाताना गांधी पुतळ्याजवळील बागेजवळ अडविले. त्याच्याशी वाद घालून धारदार शस्त्राने  हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर , सागर वाघ ,जालिंदर जाधव,यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली .


गांधीनगर खुन प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासातच अटक
Total Views: 52