बातम्या
या हल्ल्यात अभिनेता झाला गंभीर जखमी
By nisha patil - 5/13/2024 6:50:03 PM
Share This News:
अभिनेता चेतन चंद्रा याच्यावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चेतन चंद्रा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत चेतन चंद्रा रक्तबंबाळ झाला आहे. ही घटना 12 मे रोजी बेंगळुरूमध्ये घडलीय. या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या चेतन चंद्राने व्हिडीओ शेअर केला. चेतन चंद्रा हा कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.
रविवारी चेतन चंद्रा मदर्स डे निमित्ताने आईसोबत मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मंदिरातून परतत असताना जमावाने मारहाण केली. यामध्ये अभिनेत्याचे नाक तुटले आहे.
इंस्टाग्रामवर अभिनेता चेतन चंद्रा याने रक्तबंबाळ अवस्थेत एका व्हिडीओ शेअर केला आहे. मला न्याय हवा, अशी कॅप्शन देत आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे
या हल्ल्यात अभिनेता झाला गंभीर जखमी
|