बातम्या
अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल
By nisha patil - 1/4/2024 4:12:54 PM
Share This News:
अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अजय देवगण आपल्या गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, सिनेरसिकांना पडद्यावरील त्याची कॉमेडीदेखील आवडते. चित्रपटाच्या सेटवर अजय देवगण काहीसा गंभीरपणे वागत असल्याचे म्हटले जाते. मात्र, तो आपल्या सहकलाकारांची थट्टा मस्करी करण्यासोबत प्रँकही करतो. अजय देवगणला एक मस्करी मात्र महागात पडली असती. या मस्करीने अजय देवगणचा सह कलाकाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
अजय देवगण हा अनेकदा सेटवर सह-कलाकारांची थट्टा मस्करी करतो. 'मिडे-डे'ला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगणने ही बाब सांगितली होती. अजय देवगणने सांगितले की, माझ्या एका चित्रपटातील सह-कलाकाराची पत्नीही एका छोट्या शहरातील होती. तिला सिनेसृष्टीच्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी तिला तुझ्या पतीचे प्रेमप्रकरण सुरू असून रात्रीच्या वेळी कोणतीच शूटिंग सुरू नसल्याचे सांगायचो.अजय देवगणने सांगितले की, त्या माझ्या सह-कलाकाराच्या पत्नीलादेखील माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता. मी थट्टा-मस्करी करतोय हे तिला माहित होते. आम्ही आठ दिवस ही थट्टा मस्करी करत होतो. मात्र, नवव्या दिवशी सकाळी त्याच्या पत्नीने अतिप्रमाणात गोळ्या खाल्ल्या असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. अजय देवगणने सांगितले की मी तिची मस्करी करतोय हे तिला माहित होते. त्यामुळे मी तिला काही सांगितले तर माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास असून तुम्ही मस्करी करताय असे सांगायची. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर काही गोष्टी समजल्या. तिचे नवऱ्यासोबत भांडण व्हायची असे समजले. अशा प्रकारची थट्टा मस्करी करणे चु्कीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. एका युजरने ही घटना शिवाय चित्रपटाच्या सेटवरील असल्याचा अंदाज वर्तवला. एकाने वीर दासच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे अंदाज व्यक्त केला.
अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल
|