बातम्या
ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे बुधवारपासून प्रत्यक्षात वाहन पासिंग कामास सुरुवात
By nisha patil - 5/7/2023 7:33:49 PM
Share This News:
ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे बुधवारपासून प्रत्यक्षात वाहन पासिंग कामास सुरुवात
कुंभोज प्रतिनिधी -विनोद शिंगे आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून आणि कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेच्या वतीने तारदाळ येथे संस्थेच्या जागेत उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे बुधवारपासून प्रत्यक्षात वाहन पासिंग कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व केएटीपी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रेक टेस्ट केलेल्या वाहनधारकांना सर्टीफिकेटचे वितरण करण्यात आले.
तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्या वतीने स्वखर्चातून ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्यात आला आहे. सर्व निकषानुसार तयार केलेल्या ट्रॅकचे दोनच दिवसांपूर्वी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांया अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी येत्या बुधवारपासून याठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केली होती. त्यानुसार कामकाज सुरु झाले असून रिक्षा आणि अन्य वाहनांची ब्रेक टेस्ट घेऊन त्यांना सर्टीफिकेटचे वितरण करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक व्हाईस चेअरमन बाळासाहेब कलागते यांनी केले.
याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, मोटर वाहन निरिक्षक विजयसिंह भोसले, सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक सागर कासविद,संस्थेचे संचालक महादेव कांबळे, नरसिंह पारीक, महावीर कुरुंदवाडे, सुमेरू पाटील, शकुंतला जाधव, राहुल घाट, रवी मिराशी, मन्सुर सावनुरकर, प्रकाश लोखंडे, ख्वाजाभाई मुजावर, शाहीर जावळे, मुबारक बागवान, बाबासो मुल्ला, मेहबूब तहसिलदार, जब्बार पटेकरी, शहानवाज मोमीन, जॉनीभाई पटेकरी, प्रताप कांबळे तसेच इचलकरंजी शहर व परिसरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विविध वाहनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी आभार मानले.
ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे बुधवारपासून प्रत्यक्षात वाहन पासिंग कामास सुरुवात
|