बातम्या

रेणुका शुगर च्या प्रशासनाने यंदाची पहिली उचल ३३०० रूपये जाहीर

The administration of Renuka Sugar announced the first collection of Rs 3300 this year


By nisha patil - 11/25/2023 11:23:14 PM
Share This News:



रेणुका शुगर च्या प्रशासनाने यंदाची पहिली उचल ३३०० रूपये जाहीर 

दि. २३ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोली पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ९ तासाच्या चक्काजाम आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील हंगामातील १०० रूपये तसेच यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी अधिक १०० रूपये पहिली उचल जाहीर केली. त्याप्रमाणे बहुतांश साखर कारखान्याने ठरल्याप्रमाणे पहिली उचल जाहीर केली. मात्र पंचगंगा साखर कारखान्याने यंदा केवळ एफआरपी देऊ शकतो. आम्ही एफआरपी प्रमाणे ३१९४ रूपये दर देणार असल्याची भूमिका साखर कारखाना प्रशासनाने घेतलेली होती. आज स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ऊस तोडी बंद केल्या. ठरल्याप्रमाणे पंचगंगा साखर कारखान्याने एफआरपी अधिक १०० रूपये पहिली उचल दिल्याशिवाय साखर कारखाना चालू देणार नाही, अशी घोषणा करत साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी बोलताना सागर संभूशेटे म्हणाले की, पंचगंगा साखर कारखान्याने पहिली उचल विनाकपात ३३०० रूपये दिल्याशिवाय आम्ही साखर कारखाना सुरू करू देणार नाही. जोपर्यंत कारखाना प्रशासन आम्हाला लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत या कार्यालयातून हलणार नाही. अशी भूमिका घेऊन अनेक कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला. घोषणाबाजी करत पहिली ३३०० रूपये न दिल्यास अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर रेणुका शुगर्सच्या प्रशासनाने नमती भूमिका घेत. राज्यात उच्चांकी पहिली उचल ३३०० रूपये जाहीर केली. एफआरपी पेक्षाा १०६ रूपये अधिक दर पंचगंगा साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सी. एस. पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लेखी पत्र दिले. त्यानंत ठिय्या आंदोलन मागे घेतले.  यावेळी  भिमगोंडा पाटील, कलगोंडा खंजिरे, पुरंदर पाटील, राजगोंडा पाटील, कुमार जगोजे, विश्वास बालिघाटे यांच्यासह संचालक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.


रेणुका शुगर च्या प्रशासनाने यंदाची पहिली उचल ३३०० रूपये जाहीर