बातम्या
थकीत शिष्यवृत्ती जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू -
By nisha patil - 9/13/2024 12:26:24 AM
Share This News:
प्रतिनिधी- शासनाकडून शिष्यवृत्ती वेळेवर मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. खाजगी संस्था शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याने विद्यार्थ्यांना कर्ज काढून फी भरावी लागत आहे. कृपया आपण या विषयाचे गांभीर्य समजून वरिष्ठ पातळीवर याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी सौरभ शेट्टी यांनी जिल्हाधिकारी एडके यांना भेटून मागणी केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे महा डी.बी.टी अंतर्गत येणारी शिष्यवृत्ती 40 कोटी रुपये इतकी थकीत आहे. या शिष्यवृत्ती वेळेवर मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. खाजगी संस्था शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याने विद्यार्थ्यांना कर्ज काढून फी भरावी लागत आहे. अशा पद्धतीने जर सरकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना होत नसेल तर यावर त्वरित आपण पाठपुरावा करावा. कोल्हापूर जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ३२८० कोटीपेक्षाही जास्त शिष्यवृत्ती थकीत आहे. शिक्षण आज काळाची गरज आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असतील तर स्वाभिमानी विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही. येत्या महिना अखेर पर्यंत थकित रक्कम जमा करावी, अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक सरकारमधील नेत्यांना अडवून जाब विचारू, असा इशारा विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांनी दिला आहे.
थकीत शिष्यवृत्ती जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू -
|