बातम्या
सनी देओलच्या बंगल्यावरील लिलाव प्रक्रियेला अचानक स्थगिती
By nisha patil - 8/21/2023 4:36:29 PM
Share This News:
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तर दुसरेकडे अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव होणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव होणार नसल्याचं समोर आलं आहे. बँकेने नोटीस मागे घेतली आहे.
अभिनेता सनी देओलने बँक ऑफ बडोदा या बँकेकडून कर्ज घेतलं होतं. त्यासाठी मुंबईतील जुहू परिसरातील त्याचा 'सनी व्हिला' नामक बंगला अभिनेत्याने तारण म्हणून ठेवला होता. पण अभिनेत्याने या कर्जाची परतफेड केलेली नाही. 56 कोटी रुपयांची रक्कम थकवली होती. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेने अभिनेत्याच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. एक जाहीरात प्रसिद्ध करत 51 कोटी 43 लाख रुपयांची बोली लावण्यात आली. 25 सप्टेंबरला हा लिलाव होणार होता. पण आता बँकेने ही नोटीस मागे घेतल्याचं समोर आलं आहे. 'गदर 2' या सिनेमाच्या कमाईमुळे सनी देओल परतफेड करू शकतो, असे म्हटले जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत बँकेने त्यांचा निर्णय का बदलला असा प्रश्न उपस्थित केला आहे.सनी देओलचा 'सनी व्हिला' हा बंगला 599.44 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. हा लक्झरी बंगला दिसायला अतिशय आलिशान आहे. सनी देओलची एकूण संपत्ती 120 कोटींच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी अभिनेता पाच ते सहा कोटी रुपये आकारतो. 'गदर 2' या सिनेमासाठी अभिनेत्याने 20 कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.
सनी देओलच्या बंगल्यावरील लिलाव प्रक्रियेला अचानक स्थगिती
|