बातम्या

जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

The audience will get a feast of entertainment in the month of July


By nisha patil - 1/7/2023 4:52:30 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  आजपासून जुलै महिना सुरू झाला असून या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जुलै महिन्यात करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमापासून ते '72 हुरैं'पर्यंत अनेक बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे. यात प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स, कौटुंबिक, विनोदी, थरार, नाट्य असणाऱ्या सिनेमांचा समावेश आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच इनसिडियस द रेड डोर  हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा इंग्लिशसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.नीयत' हा सिनेमा येत्या 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विद्या बालन, राहुल बोस आणि अमृता पुरी मुख्य भूमिकेत आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 72 हूरें हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. संजय पूरन सिंहने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.मिशन इंपोसिबल पार्ट 7  हा सिनेमा 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टॉम क्रूजसह अनेक सुपरस्टार झळकणार आहेत. अजमेर हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित या सिनेमात राजेश शर्मा आणि अल्का अमीन मुख्य भूमिकेत आहेत. करण जोहरचा बहुचर्चित रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट आहे.


जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी