बातम्या

राज्यभरात तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची रणधुमाळी

The battle for the third phase of voting across the state


By nisha patil - 7/5/2024 4:11:23 PM
Share This News:



देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या  तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे. या निवडणुकांमध्ये मैदान मारण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनातील सर्व स्थरातील यंत्रणा देखील कामाला लागली आहे.
 

असे असले तरी राज्यातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्यात अकरा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान झाले आहे. मात्र या अनेक गावातील मतदारांनी थेट मतदानावरच बहिष्काराचे शस्त्र उगारल्याने त्याचा थेट फटका मतदानाच्या टक्केवारी आणि उमेदवारांना देखील बसण्याची शक्यता आहे.


राज्यभरात तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची रणधुमाळी