बातम्या
ऊसाच्या रसाचे फायदे अनेक माहीत असतील
By nisha patil - 1/19/2024 7:29:26 AM
Share This News:
ऊसाच्या रसामध्ये खूपसारे पोषक तत्व असतात ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्स, आय़र्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे. हे सगळे पोषक तत्व शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात.
मात्र, हेही तितकंच खरं आहे की ऊसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीराला नुकसानही होतं. एका दिवसात कुणीही दोन ग्लासपेक्षा जास्त ऊसाचा रस पिऊ नये. चला जाणून घेऊन ऊसाचा रस जास्त पिण्याचे नुकसान...
जास्त असतात कॅलरी
ऊसाच्या रसामध्ये कॅलरींचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही वजन कमी करत असाल, ऊसाचा रस कमी प्या. एका ग्लास ऊसाच्या रसात जवळपास 250 कॅलरी आणि 100 ग्रॅम शुगर असते. अशात ऊसाचा रस न प्यायल्यास बरं होईल. जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये राहिल. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि ग्लायसेमिक लोड जास्त असतो. याने शुगर लेव्हल प्रभावित होते. अशात डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी यापासून दूर रहावं.
पोट होतं खराब
जर तुम्ही एका दिवसात 5 ते 6 ग्लास ऊसाचा रस सेवन करत असाल तर तुमची हालत खराब होऊ शकते. यात पोलिकोसनॉल नावाचं तत्व असतं. जे शरीराला नुकसान पोहोचवतं. याने पोट खराब होण्यासोबतच उलटी, चक्कर येणे, इंसोम्नियाचा धोका निर्माण होऊ शकतो.
इन्फेक्शन होण्याचा धोका
ऊसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा. कारण अस्वच्छता असेल तर माश्या लागतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात नाही. काही ठिकाणी उस व्यवस्थित स्वच्छ न करताही मशीनमध्ये टाकला जातो. याने त्यावर लागलेली धुळ, माती रसात मिश्रित होते. याने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.
जास्त वेळ ठेवलेला रस पिऊ नये
अनेक लोक मार्केटमधून ऊसाचा रस आणतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानंतर 2 ते 3 तासांनी हा रस पितात. हे करणं महागात पडू शकतं. ऊसाचा रस फार लवकर खराब होतो, सोबतचो दूषितही होतो. ऊसाचा रस तुम्ही 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सीडाइज होतो. जास्त वेळ ठेवलेला रस प्यायले तर अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात. नेहमीच फ्रेश ज्यूसचं सेवन करा.
रक्त पातळ होतं
जास्त प्रमाणात ऊसाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ होऊ शकतं. कारण यात पोलिकोसनॉल असल्याने रक्त पातळ होऊ शकतं. अशात काही कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जातं. जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.
ऊसाच्या रसाचे फायदे अनेक माहीत असतील
|