बातम्या
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्ड करणार चौकशी
By nisha patil - 9/1/2024 1:25:08 PM
Share This News:
दहावी, बारावीची परीक्षा यंदाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत आहे. विद्यार्थी ची अभ्यासाची तयारी चालू आहे . त्याचवेळी परीक्षा मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु या परीक्षेसंदर्भात आलेली आकेडवारीमुळे परीक्षा मंडळ चौकशी करणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षांपेक्षा वाढली आहे. अचानक विद्यार्थी संख्या कशी वाढली? यासंदर्भात आता परीक्षा मंडळ चौकशी करणार आहे.बारावीची परीक्षा आता २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. मागील वर्षी दहावीसाठी १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले तर बारावी परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परंतु यंदा त्यात वाढ झाली आहे. दहावीची विद्यार्थी संख्या १६ लाख १० हजार झाली आहे. तर बारावीची संख्या १५ लाख १५ हजार झाली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या का वाढली, त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याची चौकशी परीक्षा मंडळ करणार आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्ड करणार चौकशी
|