बातम्या

पाडळी खुर्द येथील बेपत्ता सोनाली गौरव पाटील या महिलेचा मृतदेह सापडला विहिरीत

The body of missing woman Sonali Gaurav Patil from Padli Khurd was found in a well


By nisha patil - 3/7/2023 10:40:21 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) पाडळी खुर्द ता. करवीर येथील बेपत्ता सोनाली गौरव पाटील या महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला.मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील सोनालीचा विवाह  पाडळी खुर्द  येथील गौरव पाटील यांच्याशी झाला होता . त्याच्या विवाहास तीन झाली . दरम्यान त्यांना एक वर्षीय छोटा मुलगा आहे . गौरव हा सोनाली वारंवार त्रास देत होता . त्याचबरोबर मानसिक, शारीरिक  त्रास देता होता . त्यामुळे सोनाली गुरूवारी २९ जुलै रोजी सकाळी घरी कोणाला न सांगता बाहेर पडली होती .  त्या दरम्यान सोनालीचा शोधाशोध केली  मात्र त्या सापडल्या नाहीत . सोनाली गौरव पाटील ही महिला गुरूवारीपासुन बेपत्ता होती . आज सकाळी ८ च्या सुमारास शेतातील विहिरीमध्ये तरंगताना मृतदेह नातेवाईकांना दिसला. 28 जून पासून बेपत्ता असलेल्या सोनाली पाटील हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सीपीआर येथे पाठवण्यात आला. मयत सोनालीच्या नातेवाईकांनी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केला आरोप केला, तरी आम्हाला न्याय मिळाला अशी मागणी करण्यात आली . या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली.  यावेळी सोनालीचे 
नातेवाईकानी तिच्या मृत्यूचा जाब विचारण्यासाठी शवविच्छदन केंद्राजवळ मोठी गर्दी केली होती.
 मयत सोनाली पाटील तिचे सासर असणाऱ्या पाडळी खुर्द आणि माहेरगाव असलेल्या पन्हाळा तालुक्यातील पनुत्रे येथील लोक अशा दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी सीपीआर इथं मोठी करणे गर्दी केल्यामुळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते . मात्र करवीरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे स्वतः सीपीआर येथे आले. त्यांनी सोनालीच्या नातेवाईकांची समजूत काढत मयत सोनालीचा  भाऊ रवींद्र पाटील  यांची तक्रार दाखल करून घेतली.त्यामुळं तणाव निवळला.दरम्यान सोनालीचे नातेवाईक विष्णू मोरे यांनी सोनाली हिने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली असावी अशी शंका उपस्थित करत पोलीस प्रशासनाने आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली.सदर घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास सुरू आहे.


पाडळी खुर्द येथील बेपत्ता सोनाली गौरव पाटील या महिलेचा मृतदेह सापडला विहिरीत