बातम्या
उत्तरिय तपासणीसाठी चिमुकल्याचा जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला मृतदेह
By nisha patil - 5/12/2024 9:35:46 PM
Share This News:
कागल तालुक्यातील चिमगाव येथे कप केक खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन दोघा बहीण भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेतील श्रीयांश याचा दफन केलेला मृतदेह आज उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला. त्यानंतर उत्तरिय तपासणी करण्यात आली. यावेळी औषध प्रशासन अन्य व भेसळ प्रतिबंधात्मक विभाग, महसूल विभाग व आरोग्य पथकांच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद माने व त्यांच्या पथकाने श्रीयांशच्या होते त्याची उत्तरिय तपासणी जागीच केली.
यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कृषी सहाय्यक अधिकारी संगीता शिंदे, तलाठी स्मिता क्षारबिद्रे, पोलीस पाटील किरण भाट, बी के साठे सरपंच दीपक अंगाज, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित.
दरम्यान दोन्ही मुलांचा विषबाधेने झालेला मृत्यू दुदैवी आहे. या मुलांना खाण्याच्या घटकातून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट। होते त्यामुळे घातपाताचा प्रकार नसावा अधिक तपास होईल. मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीचे प्रयोगशाळेतून अंतिम अहवाल 'आल्यानंतर पुढील तपास व त्यादृष्टीने कारवाई होईल.असे पोलीस उपअधीक्षक
सुजितकुमार क्षीरसागर यांनी सांगितलं.
उत्तरिय तपासणीसाठी चिमुकल्याचा जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला मृतदेह
|