राजकीय
क्षीरसागरांच्या काळ्या कृत्यांच्या बॉम्ब आज जनतेसमोर फुटणार - इंगवले
By nisha patil - 11/18/2024 10:52:02 PM
Share This News:
क्षीरसागरांच्या काळ्या कृत्यांच्या बॉम्ब आज जनतेसमोर फुटणार - इंगवले
रविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरां विरोधात पेन ड्राईव्ह बॉम्ब
कोल्हापूर : ज्यांनी आयुष्यभर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच एका ब्रीदवाक्यातून अमाप माया मिळवली आणी ती कोट्यावधीची रक्कम गोळा करताना जनतेच्या कृपेने मिळालेल लोकप्रतिनिधी या पदाच्या नावाला काळीमा फासत किंवा समाजातल्या प्रत्येक स्तरावरच्या लोकांची पिळवणूक केली
त्यांच्या कृष्णकृत्याचा बॉम्ब आज जनतेसमोर पेन ड्राईव्हच्या रूपातून फुटला असे मनोगत शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील सुज्ञ जनतेने भ्रष्टाचारी व्यक्तीच्या या कृष्णकृत्यांची दखल घेऊन विचारपूर्वक मतदान करावे असे ते म्हणाले.
रविकिरण इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी केलेला जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार, क्षीरसागर आणि राजेंद्र वरपे यांच्यातील वाद याच्याशी संबंधित व्हीडीओ आणि या अनुषंगानं माध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या नकारात्मक बातम्या त्याच बरोबर राजेश क्षीरसागर यांच्यावर प्रतिकात्मक टीका करणारे व्हीडीओ असलेला पेन ड्राईव्ह लोकांपर्यंत पोहचवायला सुरुवात केलीय.
इंगवले यांनी आज महाद्वार चौकात उभं राहून नागरिकांना पेनड्राईव्ह वाटत जागरूक नागरिकांनी हे व्हिडिओ बघून मतदानाचा निर्णय घ्यावा, असं आवाहन केले. इंगवले म्हणाले, एखाद्या गावगुंडासारखं कृत्य करून स्वतः पुन्हा 'मी नाही त्यातला' या अविर्भाधातून लोकांसमोर येणारे हे माजी आमदार कोल्हापूर उत्तरमध्ये गेली 25 वर्ष शिवसेनेच्या राजकारणात काम करत असताना एका साध्या कार्यकर्त्यापासून थेट कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. पद, पैसा, प्रतिष्ठा दिली, परंतु या पदाच्या योग्य वापर न करता ते 'जाऊ तिथे हाणू' या एकाच वृत्तीने कोल्हापूरच्या जनतेला व प्रत्येक घटकाला वेठीस धरू लागले. जयप्रभा स्टुडिओ पासून कित्येक ठीकाणी कोट्यावधीची माया गोळा करणे, त्याचबरोबर सर्वसामान्यांना त्रास देणे ,आणि विकास कामाच्या नावाखाली मलिदा गोळा करणे या कृत्यामुळे बदनाम झालेले क्षीरसागर आज मताचा जोगवा मागण्यासाठी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या जनतेसमोर येत असताना त्यांच्या या पापाचा जाहीर पाढा जनतेसमोर मांडणे हे एक शिवसेनिक म्हणून माझे आद्य कर्तव्य आहे असे इंगवले म्हणाले. बाळासाहेबांच्या स्मृतीशी व उद्धवजींच्या विचारांची निष्ठा न बाळगता शिवसेनेची प्रतारणा करणाऱ्या क्षीरसागर यांना जनता निवडून देणार नाही असे ते म्हणाले.
या अशा दुष्प्रवृत्तीना माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक कोल्हापूरच्या जनतेचा साक्षीने विरोध करतील आणि पुन्हा या स्वार्थी नेत्याला आस्मान दाखवून हद्दपार करतील असे ते म्हणाले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी महायुतीचे क्षीरसागर यांच्या समोर चांगलंच आव्हान उभं केले असून सर्वसामान्य जनता राजेश लाटकर या स्वाभिमानी कार्यकर्त्याला आमदार बनवेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. शहराच्या दहा प्रमुख चौकामध्ये क्षीरसागर यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचणारे हे पेन ड्राइव्ह वाटण्यात आले. या पेन ड्राईव्ह बॉम्बची शहरात जोरात चर्चा सुरू होती
. यावेळी सागर साळोखे, योगेद्र माने, राकेश माने, बंडा लोंढे, हर्षल पाटील, सुकुमार लाड ,अक्षय ओतारी, शैलेश रासकर, ओंकार पाटील, विक्रम पाटील, संदीप साळुंखे, सोनू चौगुले ,राजकिरण सावरकर, राजन पाटील ,सोनू पाटील, सचिन कारंडे ,अमित पाटील, प्रमोद डोंगरे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
क्षीरसागरांच्या काळ्या कृत्यांच्या बॉम्ब आज जनतेसमोर फुटणार - इंगवले
|