बातम्या

तुम्हाला अपेक्षित असलेली 'ब्रेकिंग न्यूज' लवकरच येणार - छत्रपती शाहू महाराज

The breaking news you ve been waiting for is coming soon  Chhatrapati Shahu Maharaj


By nisha patil - 2/28/2024 9:17:41 PM
Share This News:



तुम्हाला अपेक्षित असलेली 'ब्रेकिंग न्यूज' लवकरच येणार - छत्रपती शाहू महाराज

कोल्हापुरात  'ब्रेकिंग न्यूज'या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शाहू महाराज यांचं मोठं वक्तव्य 

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज  निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरूच होत्या या दरम्यान मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट न्यू पॅलेस इथं जात छत्रपती शाहू महाराज भेट घेतली. यामुळं त्यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चांना  आणखी उधाण आलं होतं आता शाहू महाराजांनीच   लोकसभेबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. शाहू छत्रपती महाराज यांनी पुन्हा दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल, असे सूचक वक्तव्य शाहू महाराजांनी  यांनी केले आहे. कोल्हापुरात  'ब्रेकिंग न्यूज'या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शाहू महाराज बोलत होते. 

छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. मात्र ही ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातून नाहीतर दुसऱ्या गावातून येणार आहे.पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ब्रेकिंग न्यूज ऐषोराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे, असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले आहेत. लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळलं. मी मुंबईला सुद्धा गेलो नाही. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचा आहे. ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला नक्की बोलवेन, अशी ग्वाही शाहू महाराज छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना दिली. त्यामुळे शाहू महाराजही लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज विरोधात महायुतीकडून कोणता उमेदवार देण्यात येईल, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.


तुम्हाला अपेक्षित असलेली 'ब्रेकिंग न्यूज' लवकरच येणार - छत्रपती शाहू महाराज