बातम्या
मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या ब्रेकअपच्या चर्चा अखेर ......
By nisha patil - 10/4/2024 6:52:26 PM
Share This News:
मागील अनेक दिवसांपासून बॉलीवूडमधील दोन कलाकारांच्या मागील अनेक दिवसांपासून अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. बॉलीवूड अभिनेत्री आणि चंकी पांडे यांची लेक अनन्या पांडे आणि बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. पण आता या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरलाय.
अनन्या पांडे हिने नुकतच तिच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलंय. अनेकदा अनन्याने आदित्यला डेट करत असल्याच्या हिंटही दिल्या होत्या. त्यातच अनेकदा एकत्र दोघे डेटवर गेल्याचे स्पॉट झाले होते. आदित्य अनन्याच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. अनन्याने तिच्या इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत पोस्ट केली होती. यावर तिने म्हटलं होतं की, जर तो तुमचा असेल तर तो नक्कीच परत येईल. हे सर्व फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आहे. जर तो तुमचा असेल तर तो परत येईल. त्याचप्रमाणे यावेळी तिने या #Motivation असं कॅप्शन दिलं आहे.ड्रीम गर्ल 2' फेम अभिनेत्री अनन्या पांडे लग्न कधी करणार आहे याबद्दल उत्तर देत म्हणाली,"मला प्रेमविवाह करायला आवडेल. माझ्या आई-वडिलांचा संसार प्रेम, आदर आणि मैत्रीवरचं टिकून आहे. मीदेखील त्यांनाफॉलो करणार आहे. खरंतर मी खूपच रोमँटिक आहे. प्रेमावर माझा विश्वास आहे. आता मी फक्त 26 वर्षांची आहे. त्यामुळे लग्नाबद्दल अजून तरी विचार केलेला नाही. अजून मला खूप काम करायचं आहे".
मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या ब्रेकअपच्या चर्चा अखेर ......
|