बातम्या

किरणांचा लख्ख प्रकाश करवीर निवासिनी अंबाबाईच्या कमरेपर्यंत

The bright light of the rays reached the waist of Karveer Niwasini Ambabai


By nisha patil - 1/30/2025 10:44:08 PM
Share This News:



बुधवारी सायंकाळी करवीर निवासिनी अंबाबाईच्या कमरेपर्यंत मावळती किरणे पोहोचली. सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी किरणांचा लख्ख प्रकाश गाभाऱ्यातील मूर्तीच्या कमरेवर पोहोचताच भाविकांनी 'जय अंबे'च्या जयघोषात आरती केली. दक्षिणायन पर्वातील मुख्य किरणोत्सव सोहळ्याला ३१ जानेवारीपासून सुरवात होणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत मुख्य किरणोत्सव सोहळा होतो.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून किरणोत्सवाच्या मुख्य तीन दिवसांसह आधी व नंतर दोन दिवस किरणोत्सवाची पाहणी केली जाते. बुधवारी यादृष्टीने मंदिरातील किरणोत्सव मार्ग तसेच किरणांची प्रखरता, अडथळे यांची पाहणी करण्यात आलीय.


किरणांचा लख्ख प्रकाश करवीर निवासिनी अंबाबाईच्या कमरेपर्यंत
Total Views: 39