बातम्या
बहिणीची छेड काढल्याने भावाने केला तरुणाचा खून
By nisha patil - 1/18/2025 3:15:54 PM
Share This News:
कागल तालुक्यातील खडकेवाडा येथील स्वप्निल अशोक पाटील याने कौलगे इथल्या आशूतोष पाटील याच्या चुलत बहिणीची छेड काढली होती.याचा राग त्याच्या मनात होता.यानुसार काटा काढण्याच्या हेतूने बुधवारी मयत स्वप्नील पाटील याला आरोपींनी गाठले.
संशयित आरोपी आशुतोष व त्याचा मित्र सागर संभाजी चव्हाण यांनी खडकेवाडा इथल्या निर्जन स्थळी स्वप्नीलला नेऊन त्याच्या डोक्यात दगड घातला. दरम्यान खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत स्वप्नीलवर पेट्रोल ओतुन पेटवून दिला. काल शुक्रवारी ही खुनाची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपींना अटक केलीय.अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि मुरगूड पोलिसांनी एकत्रितपणे हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय .याचा पुढ़ील मुरगूड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.
बहिणीची छेड काढल्याने भावाने केला तरुणाचा खून
|