बातम्या

धैर्यशील मानेंची टाकवडेत प्रचार सभा संपन्न...

The campaign meeting of the brave mane in Takwade was concluded


By nisha patil - 4/27/2024 6:44:45 PM
Share This News:



शिरोळ तालुक्याचा प्रचार दौरा करून माहितीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांची टाकवडे येथे प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना हर्षवर्धन नाईक निंबाळकर सरकार म्हणाले,  येणाऱ्या काळात  नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत यात काही शंका नाही. पण मोदींच्या बाजूनं हात वर करणारा खासदार म्हणून धैर्यशील दादा असले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केले. 

 कोणी काही म्हणो पण धैर्यशील दादांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या विचारावर कायम आहेत.त्यामुळं या निवडणुकीत धैर्यशील दादांना शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून देऊया असं आवाहन ही केले.यावेळी जि. प. मा. राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, मा. शरद साखर कारखान्याचे संचालक मा.प्रकाश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, चंद्रकांत मोरे सर, भाजप तालुकाध्यक्ष मा. मुकुंद गावडे,  मनोहर निर्मळ, उदय झुटाळ, शहाजी भोसले, अबूबगर बारगीर, अविनाश पाटील,पोपट पुजारी,  राजू पाटील भोपाल मागलेकर, दाजी मगदूम,तानाजी झुटाळ, रोहित पाटील, सुनील पाटील, अशोक कुंभार,  शकुंतला कांबळे, जमाल फकीर,  सुनील निर्मळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धैर्यशील मानेंची टाकवडेत प्रचार सभा संपन्न...